Home > पुस्तकी किडा, माझ्या लेखणीतून > श्रावण – योगिनी जोगळेकर

श्रावण – योगिनी जोगळेकर

हल्ली मला नेमके कथासंग्रह वाचायला मिळत आहे. लहान लहान कथा वाचायला छान वाटतात. पण त्यावर ब्लॉग लिहिण्याचा कंटाळा येतो. असो. योगिनी जोगळेकरांची “सार्थक” आणि “आव्हान” ह्या दोन्ही कादंबऱ्या मला जशा आवडल्या होत्या तसेच हा “श्रावण ” नावाचा कथासंग्रह सुद्धा आवडला. यामध्ये २१ कथा आहेत.

१. श्रावण
श्रावणात मंगळागौर खेळणाऱ्या बायांचे दागिने दरोडेखोर पळवून नेतात. नायिकेचे सासू-सासरे मोठ्या मनाने त्यांचे दागिने स्वतःच्या खर्चातून करून देतात. घरी मंगळागौरीसाठी आलेल्या सवाष्णींनी सासरचे बोलणे खाऊन डोळ्यातून पाणी काढू नये यासाठी हि खटपट.

२. आगळा हट्ट
आयुष्यभर कोणताही हट्ट न करणारी बायको नवीन घर बागेसमोर घेण्याच्या बाबतीत मात्र हट्ट करते. तिच्या हट्टामागे काय कारण असते हे विसुभाउंना शेवटी समजते. मुलबाळ नसल्यामुळे बागेत खेळणारी लहान मुले बघून ती आनंदी होत असते. याच आगळ्या हट्टाचे वर्णन इथे केले आहे.

३. वळण
हि कथा म्हणजे २ बहिणींची एकमेकींना लिहिलेली पत्रे. १ बहिण मुलीला आधुनिक राहणीमानाचे वळण लावते तर दुसरी तिच्या मुलीला मर्यादेमध्ये राहायला शिकवते. आईच्या वळणाप्रमाणे एकीची मुलगी मित्राबरोबर पळून जाते आणि दुसरी फर्स्ट क्लास मध्ये पास होते.

४. बिदागी
खरा कलावंत हा मिळणाऱ्या बिदागीपेक्षा जातिवंत रसिकाची दाद याला महत्व देतो. हे विश्वंभर बुवा यांच्या कथेमधून सादर केले आहे.

५. नाथांची कावड
आख्याने देणाऱ्या ब्राम्हण पिलुबुवांना आपल्या बायकोने महारांवर मोफत वैद्यकीय उपचार केलेले अजिबात आवडले नाही. पण आपल्या वैद्य पित्याकडून घेतलेले सेवेचे व्रत रेणू लपून छपून सुरु ठेवते.

६. अवेळ
आपल्या आवडत्या शिष्येच्या म्हणजेच रेशमाच्या घरी गुरुजी रोज सकाळी शास्त्रीय गायन शिकवायला जात असतात. एकदा सहज अवेळी सायंकाळी तिच्या घरी ते जातात आणि तिचे दुसरे रूप त्यांच्या समोर येते.

७. वन्ही तो चेतवावा रे
परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडलेल्या नवऱ्याला त्याची पदवीधर बायको साथ देऊन त्याला पदवीधर होण्यास मदत करते आणि त्याच्या स्वयंभू तेजाला उजाळा देते.

८. संस्कार
अभिनेत्री असूनसुद्धा आपले संस्कार न विसरणाऱ्या आपल्या मित्राच्या बायकोचे कौतुक विनूने या कथेमध्ये केले आहे.

९. आमची ही आहे ना हो?
भोळासांब आणि कुरूप असलेल्या विश्वंभरची सुंदर दिसणारी बायको चाळीमधल्या प्रत्येक पुरुषासोबत संबंध जोडते. हे सहन न होवून त्याला वेड लागते आणि तो प्रत्येकाला “आमची ही आहे ना हो?” असे विचारत फिरतो.

१०. पायरी
सरंजाम्यांची पिढीजात कुळंबीण असलेली गुणा ही त्यांच्या कुटुंबाची प्रत्येक प्रसंगामध्ये कशी साथ देते याचे वर्णन केले आहे.

११. पूर्वसंचित
गोंडस आणि गुणी असून मुका असणाऱ्या अपूर्व या मुलाला त्याची आई सव्वा महिन्याचा असतानाच सोडून जाते. याचे कारण तिचे नृत्याशास्त्रामधील करियर हे असते. आईच्या पूर्वसंचितामुळे मुलाला दुःख भोगावे लागते.

१२. शिवण
१२ वर्षाची लहान मुलगी आई वारल्यानंतर आपल्या लहान भावंडांची आणि वडिलांची जबाबदारी उचलते आणि ती शेवटपर्यंत निस्वार्थी पणाने निभावते.

१३. माती
पानशेतच्या पुरामध्ये ४ मजली वाडा आणि वडील गेल्यामुळे कावेरी, तिची आई आणि भावंडे गरीब झालेले असतात. तरी तिचे या वाड्याच्या मातीशी घट्ट नाते असते. प्रियकराचे वडील या वाड्यावर नजर ठेवून असतात. कावेरीच्या म्हणण्याप्रमाणे वाड्याची माती तिच्या लग्नाच्या भोवल्याला जरी कामी नाही आली तरी तिच्या समाधीसाठी उपयोगात येते.

१४. पारख
इंजिनिअर असलेला दीपक ड्रायवर बनून ठकुमावशीकडे वारंवार पुरणपोळीची ऑर्डर घ्यायला जात असतो. त्याचे कारण ठकुमावशीची भाची वीणा हिच्यावर जडलेले त्याचे प्रेम. तो ड्रायवर असूनसुद्धा ती त्याच्या प्रेमात पडते आणि शेवटी सत्य समजून गोड शेवट होतो.

१५. चिमणे काळीज-चिमणी कळ
लहान विजूला आपल्या सतत त्रासलेल्या आणि महिला मंडळामध्ये गर्क असलेल्या आईपेक्षा आपल्या मित्राची प्रेमळ आई आवडते.

१६. वैजू
उषाकडे बघून आपल्या वारलेल्या बहिणीची म्हणजेच वैजूची आठवण अजयला येते. पण त्याच्या अशा बघण्यामुळे उषाचा भलताच गैरसमज होतो.

१७. शापित वरदान
खांसाहेबांसारख्या उत्कृष्ट सतारवादकला सुंदर पण बहिऱ्या बायकोचे शापित वरदान मिळते. जगासाठी जरी ती सुंदर असली तरी त्यांच्यासाठी ती कुरूप ठरते.

१८. मला यशोदा होऊ दे
दत्तक घेतलेल्या मुलाचा अपघात होऊन तो अधू बनतो. पण त्याची जन्मदाती आई त्याला न्यायला लागते पण हि यशोदा तिला विनवणी करायला थकत नाही.

१९. म्हशीची शिंगे
वेणू नावाच्या भांडेवालीच्या लहान बाळाचा जीव तिची जाऊबाई घेते. तेव्हापासून दुसऱ्या बाळाला ती उन्हातान्हात सुद्धा घरी ठेवत नाही. कडेवर घेऊन फिरते . म्हशीची शिंगे तिला कधी जड होत नाही.

२०. वाट चुकलेली मुलगी
तिलोत्तमा नावाची वेश्या आपल्या मुलीला संस्कारांपासून दूर शाळेत कायमची सोडून येते. पण तिची शिक्षिका तिचा पत्ता अचूक शोधून तिला तिच्या घरी नेऊन सोडते.

२१. ब्रेड
अध्वे नावाचे सद्गृहस्थ रोज एका भिकाऱ्याला लोणी आणि ताजा ब्रेड देत असतात. ते वारल्यानंतर मोठ्या साहेबांपासून ते भिकाऱ्यापर्यंत सगळेच दुखी होतात.

Advertisements
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

तुमची प्रतिक्रिया इथे मांडू शकता

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: